Banana Conferance /सावदा येथे २३ एप्रिलला पहिली राज्यस्तरीय केळी परिषद
Banana Conference
हि परिषद सावदा येथील स्व प्रभाकर महाजन सभागृहात २३ एप्रिलला आयोजित करण्यात आली आहे. केळीचा शालेय पोषण आहारात समावेश करावा, तसेच केळीला शासनाने सवलती द्याव्यात, टिशूकल्चर रोपांना अनुदान द्यावे यासह अन्य विषयांवर या परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पुढील दिशा ठरविण्यात येईल. यावेळी महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघातर्फे उत्कृष्ट केळी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना केळीरत्न कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या परिषदेला कृषी विभागाचे वरिष्ठ शासकीय अधिकारी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, केळी तज्ज्ञ व मार्गदर्शक तसेच केळी संशोधन केंद्राचे संशोधक उपस्थित राहणार आहेत. परिसरातील बहुसंख्य केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या परिषदेला उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघातर्फे अध्यक्ष किरण चव्हाण व कार्य गौरव समिती अध्यक्ष अतुल माने पाटील यांनी केले आहे